Jivan Vidya Mission
सी. एच. एम. ई. सोसायटी संचालित विद्याप्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यम येथे मंगळवार दिनांक ७ जानेवारी 2025 रोजी वामनराव पै. जीवन विद्या मिशन मुंबईतर्फे “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” या विषयावर इयत्ता पाचवी ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती.या कार्यशाळेसाठी माननीय श्री पांडुरंग गोरे (रिटायर्ड असिस्टंट मॅनेजर एअर इंडिया) , अजिंक्य मांजरेकर (अकाउंटंट).
चांगली संगत लाभणे आणि योग्य ते मार्गदर्शन मिळणे या दोन्ही गोष्टी दुर्मिळ आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा त्या मिळतील तेव्हा त्या आत्मसात कराव्या असे प्रतिपादन पांडुरंग गोरे यांनी केले.फक्त ज्ञानार्जन करू नका तर ते ज्ञान उपयोगात देखील आणा. राष्ट्राच्या उपयोगासाठी ज्ञानाचा वापर करावा. राष्ट्र नावाच्या बोटीत सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र असतात पण एकदा का बोट बुडाली की सर्व लोक बुडतात. म्हणून राष्ट्र सामर्थ्यवान व्हावे यासाठी संघटित होणे आवश्यक आहे. ज्ञान हे शस्त्र ,अस्त्र आणि शास्त्र आहे. ज्ञानासंपत्ती म्हणजे ऐश्वर्य आहे .म्हणूनच अभ्यासाच्या काही क्लुप्त्या देखील त्यांनी सांगितल्या.
वेगवेगळे प्रेरणादायी विचार तसेच काही गाणी यातून विद्यार्थ्यांचे लक्ष खिळवत ठेवत विद्यार्थ्यांना अभ्यास, ज्ञान आणि जीवनाचे कौशल्य सोप्या पद्धतीने सांगितले. यासाठी मार्गदर्शन शालेय समिती अध्यक्ष जयंत खेडेकर सर यांचे लाभले. या कार्यशाळेसाठी शाळेचे मुख्याध्यापक राजन चेट्टीयार सर , शाळेच्या समन्वयक मीनाक्षी आमले मॅडम, इयत्ता पाचवी ते सातवी च्या शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.