विद्या प्रबोधिनी मध्ये दीप अमावास्या उत्साहात साजरी.
नाशिक: सेंट्रल हिंदू मिलिटरी संचलित विद्या प्रबोधिनी प्रशाला (इंग्रजी माध्यम) शाळेत शुक्रवार (2 ऑगस्ट 2024) शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील "दीप अमावास्या" इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शना खाली उत्साहात पार पाडली.
"आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात. श्रावणाचा पवित्र महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते." विद्यार्थ्यांना दीप अमावास्या का साजरी केली जाते हे कळावे हा यामागील हेतू असून,विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या दीपांची माहिती व सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी दीपांचे आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे. हे कार्यक्रमाच्या द्वारे निदर्शनास आणून दिले.सूत्रसंचालना पासून तर संपूर्ण कार्यक्रमाची धुरा ही विद्यार्थ्यांनी सांभाळलेली होती. विद्यार्थ्यांनी दीपांची माहिती सांगितल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांन समवेत दीप प्रज्वलित केले. विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती आणि संस्कारांची मूल्ये जोपासणे,नेतृत्व गुण, वक्तृत्व, सभा धीटपणा, संवाद कौशल्य, आत्मविश्वास,लेखन-वाचन, सृजनशीलता, निर्णयक्षमता, श्रमप्रतिष्ठा व कलाकौशल्य हे मूल्य रुजावे या उद्देशाने हा कार्यक्रम राबवण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सौ. राधिका गायधनी मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी सौ. राधिका गायधनी मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले, तसेच काही बोलां सह तबलावादन सादर केले.
या कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या अध्यक्षा सौ.आसावरी धर्माधिकारी मॅडम उपस्थित होत्या. त्यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली हा दीप अमावास्ये चा कार्यक्रम राबविण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजन चेट्टीयार आणि शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. प्रियंका भट आणि समन्वयक सौ. मीनाक्षी आमले उपस्थित होत्या. अशा प्रकारे हा दीप अमावास्येचा कार्यक्रम दीपांच्या लखलखीत प्रकाशाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.