विद्यारंभ संस्कार
सी. एच. एम.ई सोसायटी संचालित विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यारंभ संस्कार हा कार्यक्रम घेण्यात आला.त्यांच्या शिक्षणातील दुसऱ्या टप्प्याला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली,म्हणून हे संस्कार करण्यात येतात. यात वेदोपनिषदातील काही मंत्रांचे आणि ऋचांचे पठण करून घेतले जाते. यात विद्येची देवता सरस्वतीचे वंदन आणि पुजन करून तिचे स्तवन केले जाते; आणि विद्यार्थ्यांकडून संकल्प करून घेतला जातो. त्याच वेळेस शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्याचे महत्व देखील सांगितले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध बासुरी वादक श्री सुहास दत्तात्रेय वैद्य उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषणातून दैनंदिन जीवनामध्ये कसे वागावे व भविष्यात मोठी स्वप्न कशी बघावी याबाबत मार्गदर्शन केले.

_202408010833170877_H@@IGHT_714_W@@IDTH_1600.jpeg)
शालेय समिती अध्यक्ष स आसावरी धर्माधिकारी मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या स्वतःमध्ये मूल्य कशी रु उजवावी याबद्दल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी शालेय समिती अध्यक्ष सौ.आसावरी धर्माधिकारी मॅडम, मुख्याध्यापक श्री राजन चेट्टीयार सर व पर्यवेक्षिका सौ.प्रियांका भट मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मराठी शिक्षिका सौ.श्रद्धा घोलप,संगीत शिक्षिका सौ. नीलिमा दलाल ,चित्रकला शिक्षिका सौ. प्रगती जाधव यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाची सांगता शाळेच्या समन्वयक सौ .मीनाक्षी आमले मॅडम यांनी आभार प्रदर्शन केली.