कारगिल विजय दिवस_202407300902097734_H@@IGHT_516_W@@IDTH_1156.jpeg)
२६ जुलै, २०२४ रोजी कारगिल विजय दिवसाला २५ वर्षे पूर्ण झाली, या पार्श्वभूमीवर सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यम येथे दर वर्षी प्रमाणे शहिद जवानांना श्रद्धांजलि अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात धर्मवीर डॉ.बा.शि.मुंजे व भारतमातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ति रूजावी या उद्देश्याने इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी कारगिल युद्धातील प्रसंग सादर करत शहीद जवानांना अभिवादन केले. तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर करत वातावरण चैतन्यमय केले.
कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजन चेट्टीयार सर,शाळेच्या समन्वयक सौ.मीनाक्षी आमले, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना सैनिकांचे आपल्या देशाविषयी कर्तव्य व त्यांचे योगदान याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदे मातरम् ने करण्यात आली.कार्यक्रमासाठी शाळेच्या चेअरमन सौ. आसावरी धर्माधिकारी मॅडम , शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजन चेट्टीयार सर आणि पर्यवेक्षिका सौ. प्रियंका भट मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका सौ. स्मिता अहिरे , सौ.प्राची देशपांडे,सौ. प्रगती जाधव व इतर सहकारी शिक्षिकांनी परिश्रम घेतले.