व्यक्तिमत्त्व विकास आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण

13 Jul 2024 08:44:32
      
 व्यक्तिमत्त्व विकास आणि स्वसंरक्षण
 
*स्वसंरक्षण ही काळाची गरज !!" यासाठी
विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यम येथे विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकास आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली. यासाठी स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समिती अर्थातच राणी भवन आणि विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने हा व्यक्तिमत्त्व विकास आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम शाळेच्या अध्यक्षा सौ.आसावरी धर्माधिकारी यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला आहे.
 

 व्यक्तिमत्त्व विकास आणि स्वसंरक्षण 
हे स्वसंरक्षण प्रशिक्षण संपूर्ण शैक्षणिक वर्षासाठी राबवण्यात येते, यामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींचा सहभाग असतो.
मुली व महिलांचे विनयभंग असो, किंवा मारहाण असो किंवा बलात्काराच्या वाढत्या घटना असो…महिलांची सुरक्षितता हा आजही महत्त्वाचा प्रश्न बनून राहिला आहे. आजवर कितीतरी ॲप्स सुरू झाले, हेल्पलाइन्स आल्या पण वेळेवर मदत मिळेल न मिळेल, मुळात समाजाची मानसिकताच काही केल्या बदलत नाहीय. विकृत मनोवृत्तीच्या लोकांना कायद्याचा वचक राहिलेला नाही. अशा वेळी स्वतःच स्वतःच्या संरक्षणासाठी सिद्ध होण्याखेरीज दुसरा पर्याय राहिलेला नाही.
 

 व्यक्तिमत्त्व विकास आणि स्वसंरक्षण 
या प्रशिक्षणा च्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रसेवा समितीची नाशिक शहराची संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी पाहणाऱ्या सौ. शुभदा राजे मॅडम व शारदा शाखेच्या सेविका सौ.रश्मी पाठक मॅडम त्याचप्रमाणे विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापक श्री.राजन चेट्टीयार सर , शिक्षक वृंद व प्रशालेच्या विद्यार्थिनी हे सर्व उपस्थित होत्या . कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, भारतमाता, डॉ. मुंजे यांचे प्रतिमा पूजन आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या गीताने झाली.मान्यवरांचा परिचय आणि आणि सत्कार करण्यात आले . संपूर्ण कार्यक्रमांची धुरा शाळेच्या १० वी च्या विद्यार्थ्यांनींनी सांभाळली होती, त्यांनीच प्रस्तावना , स्वागत ,परिचय आणि आभारही मानले. रश्मी पाठक मॅडम यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे महत्त्व अतिशय सोप्या आणि साध्या शब्दात सांगितले .माननीय राजे मॅडम यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे स्वसंरक्षण यावर माहिती दिली. या.कार्यक्रमाला शालेय समितीचे अध्यक्ष आसावरी धर्माधिकारी मॅडम,मा. मुख्याध्यापक श्री.राजन चेट्टीयार ,पर्यवेक्षिका सौ. प्रियांका भट मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी शिक्षिका सौ श्रद्धा घोलप यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाची सांगता प्रार्थनेने झाली. सर्व विद्यार्थिनींनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला.
Central Hindu Military Education Society
 
Powered By Sangraha 9.0