विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यम मध्ये नवगतांचे स्वागत मोठ्या उत्साहात

विद्यालयः उद्यानम् अस्ति, वयं सर्वे तस्मिन् उद्याने पुष्पाणि स्मः।
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आज नवगतांसाठी प्रवेश उत्सव पारंपारिक पद्धतीने व मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.प्रत्येक विद्यार्थ्यांचे औक्षण करत त्यांच्या वर पुष्प वृष्टी करून, आशीर्वचन म्हणत स्वागत करण्यात आले. आज शाळेच्या प्रथम दिनाचा प्रारंभ विद्यार्थ्यांद्वारा श्रीगणेश एवं सरस्वती पूजनाने झाला. शाळेच्या अध्यक्ष सौ असावरी धर्माधिकारी यांच्या संकल्पनेनुसार संस्कृत भाषेतून कार्यक्रमाचे सुत्रसंचलन, शिक्षकांची ओळख आणि मुलांची ओळख असा कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांचे स्वागतासाठी शाळेतील शिक्षकांनी मंत्रमुग्ध असे स्वागत गीत गायले.
पाचवी च्य वर्गशिक्षिकांनी आपला परिचय संस्कृत भाषेतून करून दिला . तसेच काही विद्यार्थ्यांनीही आपला परिचय संस्कृत भाषेत करून दिला. आज शाळेच्या प्रथम
दिनी विद्यालयः उद्यानम् अस्ति, वयं सर्वे तस्मिन् उद्याने पुष्पाणि स्मः।* या संकल्पनेला प्राधान्य देऊन विविध फुलांच्या चित्रांच्या सोबत सर्व विद्यार्थ्यांचे छायाचित्रे काढण्यात आले. पाचवीच्या मुलांना नंतर चिक्की वाटपही करण्यात आले.अशाप्रकारे प्रथम दिन विद्यार्थ्यांनसाठी अतिशय गोड होता व शेवटी प्रसन्नमुद्रेने तसेच आनंदात हे लहानगे विद्यार्थी आपल्या घरी गेले.
प्रवेश महोत्सवासाठी शाळेच्या अध्यक्षा सौ आसावरी धर्माधिकारी मुख्याध्यापक श्री राजन चेट्टीयार यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाच्या *यशस्वीतेसाठी पर्यवेक्षिका सौ. प्रियांका भट ,
सौ. स्मिता जोशी, सौ.श्रद्धा घोलप, सौ नीलिमा दलाल, सौ प्रगती जाधव यांचे सहकार्य लाभले*.
धन्यवाद