योग दिन

योग दिन

Vidya Prabodhini Prashala English 5th to 10th    27-Jun-2024
Total Views |
!! योगः कर्मसु कौशलम् !!
विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत योग दिन साजरा
 

योग दिन 
 
योग दिन 
दि. २१ जून हा ‘आंतराष्ट्रीय योग दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे.
याच निमित्ताने विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत योग दिन साजरा केला गेला.
कुशल चितैकग्गता योगः।’ कुशल चित्ताची एकाग्रता म्हणजे योग, असे बौद्ध तत्त्वज्ञानात म्हटले आहे. विष्णुपुराणाने आत्माचे परमात्म्याशी मिलन म्हणजे ‘योग’ मानले आहे. (योगः संयोग इत्युक्तः जीवात्म परमात्मने) ‘योगः कर्मसु कौशलम् ‘म्हणत गीतेने योगाला व्यावहारिक आयाम दिला आहे.
 


ff 
कार्यक्रमाचा प्रारंम्भ दीपप्रज्वलन , सरस्वती पूजन तसेच डॉक्टर मुंजे यांच्या प्रतिमापूजनाने झाला.
नन्तर मधुर स्वरात विद्यार्थिनींनी "योगशक्ती..हे
योग गीत गायले.कार्यक्रमात नन्तर योगाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले .प्रात्यक्षिकात सूर्यनमस्कार
मंडूकासन, शशकासन, गोमुखासन, वक्रासन, भुजंगासन, शलभासन, मर्कटासन, पवनमुक्तासन, अर्ध पवनमुक्तासन, अर्ध-हलासन, पादव्रित्तासन, द्विचक्रिकासन
शवासन,प्राणायाम इत्यादी आसनांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमास लाभलेल्या मुख्य अतिथी भारती राजेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांनशी साधलेल्या संवादातून पतंजलींनी सांगितलेली यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे विद्यार्थ्यांना समजून सांगीतली . निरोगी जीवनाचे मह्त्व, ध्यान,योगासने, ध्यानधारणा, ओंकार ,आहार जीवनात किती महत्वपूर्ण आहे,हे समजवुन सांगितले.
या दिनाच्या औचित्य साधून शाळेच्या शालेय समितीच्या अध्यक्षा सौ आसावरी धर्माधिकारी यांनी शाळेच्या वाचनालयाला बौद्धिक व्यायामासाठी 54 पुस्तके प्रदान केली ज्यामुळे शरीर संपदे बरोबरच बौद्धिक संपदा ही विद्यार्थ्यांना मिळेल
त्यामुळे एक प्रतिभासंपन्न विद्यार्थी तयार होईल.
तसेच या कार्यक्रमात,विद्यार्थ्यांकडून योग संकल्प करून घेण्यात आला.कार्यक्रमाचे आकर्षण महिषासुरमर्दिनी स्तोत्रावर आधारित मनमोहक समूह नृत्य सादर करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी योग प्रशिक्षक ऋषिकेश पवार, हरिता वराडे, काजल शर्मा यांनी विद्यार्थी विद्यार्थ्यांचे योग्य प्रात्यक्षिक घेतले
या कार्यक्रमासाठी शालेय समितीच्या अध्यक्षा सौ आसावरी धर्माधिकारी मॅडम, मुख्यध्यापक श्री राजन चिट्टीयार सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या पर्यवेक्षिका सौ प्रियांका भट, क्रीडाशिक्षक श्री.अनिल दुसाने सर, सौ.शिला उगले, सौ. श्रद्धा घोलप, सौ. प्राची देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले.