बालसभा इ. 5 वीअ/ ब/ क/ ड

Vidya Prabodhini Prashala English 5th to 10th    16-Mar-2024
Total Views |

बालसभा इ. 5 वीअ/ ब/ क/ ड
सी.एच.एम.ई.सोसायटी संचालित विद्या प्रबोधिनी प्रशाला (इंग्रजी माध्यम)शाळेत शुक्रवार दि. 15/3/2024 रोजी शैक्षणिक बालसभा इ. 5 वीअ/ ब/ क/ ड च्या विद्यार्थ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने अतिशय उत्साहात पार पाडली. या बालसभेचे वैशिष्ट्य म्हणजे बालकांनी स्वतः नियोजन व आयोजन करून बालकांसाठी घेतलेली सभा होय.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली. या सभेत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धन या विषया वर आपले विचार मांडले. तसेच प्रमुख विद्यार्थी अतिथी सारंगा हिने पर्यावरण संरक्षण कसे करावे याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख अतिथी शाळेचे मुख्याध्यापक श्री राजन चेट्टियार सर पर्यावरण व पर्यावरण स्वच्छ कसे ठेवावे स्वच्छ कसे राहील यासाठी छोट्या-मोठ्या उपाययोजना सांगून पर्यावरण स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. सोनाली मॅडमने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पर्यावरणातील स्वच्छता व निगा कसे राखता येईल हे उदाहरणाद्वारे समजावून सांगितले . विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या बालसभेचे सूत्रसंचलन केले. "मुक्या प्राण्याची कैफियत" या नाटिकेतून मुक्या प्राण्यांना कसा त्रास होतो प्रदूषणाचा त्यांच्यावर कसा विपरीत परिणाम होतो. हे नाट्य सादर केले.कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजन चेट्टियार सर यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. या बालसभेसाठी शाळेच्या शिक्षिका सौ. राजश्री आहेर व स्नेहा जोशी यांनी पुढाकार घेतला.
शाळेच्या अध्यक्ष मा. सौ. आसावरी धर्माधिकारी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले
 
 
बालसभा इ. 5 वीअ/ ब/ क/ ड