किशोर वय हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अतिशय महत्वाचे वय असते कारण ते त्या व्यक्तीचे भविष्य ठरवते.🍁
शनिवार दिनांक 9 डिसेंबर 23 रोजी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी सोसायटीने साथी यांच्या संयुक्त विद्यमाने
_202401032109075972_H@@IGHT_780_W@@IDTH_1040.jpeg)
चे आयोजन केले होते. संपूर्ण कार्यक्रमासाठीचे नियोजन व मार्गदर्शन डॉ. कणीकर सर व अध्यक्षा सौ.सुवर्णा दाबक मॅडम. यांचे लाभले.
4 डिसेंबर 23 ते 7 डिसेंबर या कालावधीत 4 सत्रे घेण्यात आली
इयत्ता 8 वी आणि इयत्ता 9 वी च्या एकूण 20 विद्यार्थ्यांना 6 विषयांवर किशोरवयीन शिक्षक म्हणून प्रशिक्षण देण्यात आले.
1) माझे शरीर, माझी अमूल्य संपत्ती- माझी जबाबदारी
२) मनात येणाऱ्या वाईट विचारांना आळा घालणे
3) शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणे
4) निसर्गाची देणगी.
५) मनोधैंर्य वाढवणे.
6) पराक्रमी वृत्ती स्थापित करणे.
सर्व किशोरवयीन शिक्षकांना शाळेच्या शिक्षिका अनिता म्हस्के व मनीषा बेंडकोळी यांचे मार्गदर्शन लाभले
सर्व विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजामध्ये किशोरवयीन शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी रांगोळी स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा इत्यादी काही स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि खालीलप्रमाणे उत्तम यश संपादन केले -
🌸 पोस्टर मेकिंग 🌸
🏆 प्रथम पारितोषिक:- कार्तिक चेट्टियार (९वी अ)
🌸 रांगोळी काढणे 🌸
🏆 पल्लवी सामंत आणि ज्योती शर्मा - तृतीय पारितोषिक.( ९ क)
पोस्टर मेकिंग व रांगोळी मेकिंग स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना सौ. प्रगती जाधव यांचे मार्गदर्शन लाभले
शाळेच्या अध्यक्षा सौ. आसावरी धर्माधिकारी आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री राजन चेट्टियार सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे समाजात नैतिक मूल्ये रुजवणे आणि जन जागृती करणे हा होता.