आषाढी एकादशी

09 Sep 2023 10:55:51
सी.एच.एम.ई. सोसायटी संचलित विदया प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यम या शाळेमध्ये बुधवार दिनांक २८/०६/२३ रोजी आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली.
 
आषाढी एकादशी
 
 शालेय अभ्यासाबरोबरच विविध सण, उत्सवातून विद्यार्थ्यांवर संस्कारक्षम मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला जात असतो.यावेळच्या दिंडीमध्ये आधुनिक तिकडे धावणारा विद्यार्थी याने नैतिक मूल्य कसे सांभाळावे त्याचे जतन कसं करावं यावर मार्गदर्शन करण्यात आले भारुड या काव्यातून संस्कार मूल्य म्हणजेच व्हॅल्यू हे किती महत्त्वाचे आहे हेही विद्यार्थ्यांसमोर सादर केले त्याचप्रमाणे वारकरी खेळतात त्या खेळाबरोबरच सध्या सबलीकरण किंवा स्वसंरक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा मुद्दा असल्यामुळे लाठीकाठीचाही खेळ या शाळेत करण्यात आला, पावाली हे टाळ नृत्य सादर करून वारकरी संप्रदायातील लयबद्ध शिस्त येथे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली.आषाढी एकादशी महत्व व संत साहित्य याची ओळख संतांची नावे आणि वारकऱ्यांची परंपरा यावर मुलांना माहिती देण्यात आली मुलांना विविध संतांची माहिती व्हावी तसेच त्यांच्या साहित्याची व ओळख व्हावी, या उद्देशाने आषाढी एकादशीच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

आषाढी एकादशी 
कार्यक्रम प्रसंगी शालेय समिती अध्यक्षा सौ. आसावरी धर्माधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापक श्री.राजन चेट्टीयार सर उपस्थित होते. शालेय समिती अध्यक्षा सौ. आसावरी धर्माधिकारी माननीय मुख्याध्यापक यांच्या हस्ते विठुरायाच्या प्रतिमेचे पूजन व आरती झाली आणि भारतीय संस्कृतीचा वारसा ज्यांनी जपला व पुढील दिला या बद्दाल मार्गदर्शन केले.
 
आषाढी एकादशी
 
अशा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत मुक्ताबाई अशा अनेक संतांची वेशभूषा करून आले होते, तसेच वारकरी बनून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी दिंडीचा आनंद घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संतांचे स्वगत केले.संपूर्ण वातावरणात विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमला. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यपक श्री राजन सरांचे मार्गदर्शन लाभले.
Powered By Sangraha 9.0