नागपंचमी

नागपंचमी

Vidya Prabodhini Prashala English 5th to 10th    16-Sep-2023
Total Views |

 
नागपंचमी हा आपला पारंपारिक सण.. श्रावणातल्या, "एक आटपाट नगर होतं" या कहाणी बरोबर सुरु होणारा... ते भुतदयेची शिकवण देऊन साता उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण करणारा असा!!
 
 
नागपंचमी
 
या सणाचा उत्सव मूर्ती असलेला नाग तसेच सर्व सर्पजाती याविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करणे तसेच वर्षानुवर्ष समाजमनात असलेले गैरसमज दूर करणे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सर्पजाती बद्दलची माहिती देऊन त्यासंबंधी जागृकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आज विद्या प्रबोधिनी इंग्लिश मीडियम, भोसला नाशिक येथे वन्यजीव संरक्षण संस्था VJSS सर्पमित्रांचे व्याख्यान आयोजित केले.
 
नागपंचमी
 
 

सर्पमित्र जयेश पाटील आणि दीपक महाजन आदित्य केदारे व हेमंत कोलते यांनी सर्पांच्या विविध जाती- प्रजाती, विषारी -बिनविषारी असे सापांचे वर्गीकरण तसेच बिनविषारी व विषारी सापांमध्ये असलेले साम्य त्याचप्रमाणे सर्पदंश झाल्यानंतर करण्यात येणारे प्रथमोपचार या संबंधीची माहिती विद्यार्थ्यांना अत्यंत सहज व सोपेपणाने दिली.
 
 
 
नागपंचमी
 
याप्रसंगी शाळेच्या अध्यक्ष सौ असावरी धर्माधिकारी Asawari Kulkarni Dharmadhikari मुख्याध्यापक श्री राजन चेट्टियार उपस्थित होते.
सूत्रसंचालन सौ.प्राची देशपांडे यांनी केले. शिक्षिका सौ.स्मिता आहिरे यांनी आभार प्रदर्शन केले.
Central Hindu Military Education Society
नागपंचमी