विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यम
🍂 दरवर्षीप्रमाणे आजही दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्लिश मीडियम येथे
साजरा करण्यात आला .यात आज इयत्ता पाचवीच्या विद्यार्थीनीं साठी भोंडला चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींना आजच्या दिवसाचे महत्त्व सांगून शिक्षकांनी भोंडला कसा खेळतात याबद्दल मार्गदर्शन केले. भोंडला खेळण्यासाठी विद्यार्थिनी परकर पोलके, नऊवारी साडी , सहावारी साडी, अशा प्रकारची वेशभूषा परिधान करून आल्या होत्या.
शाळेच्या संगीत शिक्षिका व विद्यार्थ्यांनी गाणी म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली . गाणी म्हणत फेर धरून नाचताना विद्यार्थिनींच्या हावभावातून गोष्ट उलगडत गेली. कार्यक्रमाच्या शेवटी मुलींना प्रसाद वाटण्यात आला .
कार्यक्रमाला शाळेच्या चेअरमन सौ. आसावरी धर्माधिकारी उपस्थित होत्या.त्यांनी शिक्षकांना व विद्यार्थ्यांना नवरात्री च्या नऊ दिवसांचे महत्त्व व भोंडला खेळताना पाटावरती हत्तीचे🐘 चित्र का काढतात याबद्दलची सविस्तर माहिती दिली .तसेच हस्त नक्षत्रातील पावसाचे शेतीच्या🌾🌾 दृष्टीने कसे महत्त्व आहे हे समजावून सांगितले.
भोंडल्याच्या माध्यमातून आपली संस्कृती सगळ्यांनी जपली पाहिजे असे शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले.
कार्यक्रमाला शाळेच्या चेअरमन सौ. आसावरी धर्माधिकारी मॅडम व शाळेचे मुख्याध्यापक श्री राजन चेटीयार सर यांचे मार्गदर्शन लाभले.