सी.एच.एम.ई.सोसायटी संचालित विद्या प्रबोधिनी प्रशाला (इंग्रजी माध्यम) शाळेत मंगळवार दि. 26/12/2023 रोजी शैक्षणिक बालसभा इ. ७वी ब च्या विद्यार्थ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने अतिशय उत्साहात पार पाडली. या बालसभेचे वैशिष्ट्य म्हणजे बालकांनी स्वतः नियोजन व आयोजन करून बालकांसाठी घेतलेली सभा होय. यात विद्यार्थ्यांनी स्वतः सर्व नियोजन करून त्यावर यशस्वीपणे अंमलबजावणी केली. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, वक्तृत्व, सभाधीटपणा, संवाद कौशल्य, आत्मविश्वास,लेखन-वाचन, सृजनशीलता, निर्णयक्षमता, श्रमप्रतिष्ठा व कलाकौशल्य हे मूल्य रुजावे हा या सभेचा मुख्य उद्देश होता.
या सभेसाठी प्रमुख अतिथी मा. सौ स्मिता जोशी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली. या सभेत विद्यार्थ्यांनी गोमाता संरक्षण व संवर्धन या विषया वर आपले विचार मांडले. तसेच प्रमुख विद्यार्थी अतिथी श्राघवी चौधरी हिने गोमाता संरक्षण कसे करावे याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख अतिथी सौ स्मिता जोशी यांनी गोमाता संरक्षण व संवर्धन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले व शाळेचे मुख्याध्यापक श्री राजन चेट्टियार सर यांनी व शाळेच्या सौ सोनाली अकोलकर विद्यार्थ्यांना गो दान का करावे? याचे महत्त्व समजावून सांगितले विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या बालसभेचे सूत्रसंचलन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री राजन चेट्टियार यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. या बालसभे साठी शाळेच्या अध्यक्ष मा. सौ. आसावरी धर्माधिकारी मॅडम शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजन चेट्टियार सर , शाळेच्या शिक्षिका सौ राजश्री आहेर व स्नेहा जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.