विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्लिश मीडियम स्कूल
21 जुलै रोजी , शाळेच्या अध्यक्षा सौ. आसावरी धर्माधिकारी यांनी पुढाकार घेऊन इयत्ता दहावीच्या मुलींसाठी सुरू केलेल्या स्वसंरक्षण(self defence ) या उपक्रमाचा आज १५ डिसेंबर 23 रोजी समारोप समारंभ झाला . कार्यक्रमासाठी सौ.शुभदा राजे , सौ. शोभा गोसावी मॅडम तसेच रश्मी मॅडम व इतर त्यांच्या सहकारी उपस्थित होत्या . इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी साठी मागील सहा महिन्यांमध्ये आठ सेशन मध्ये स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले . यामध्ये मुलींच्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरावर स्वसंरक्षणार्थ सक्षम बनवण्यात आले मुलींनी सुद्धा उत्स्फूर्ततेने प्रत्येक सेशन मध्ये उपस्थिती लावली होती.
या उपक्रमात मुलींना स्वतःचे रक्षण कसे करावे आणि त्यासाठी मनाशी कशी पक्की सांगड घातली पाहीजे याचे ही त्यांना ज्ञान देण्यात आले.
आज समारोपात सौ शुभदा राजे यांनी मुलींना मार्गदर्शन केले .आपल्याबरोबर दुसऱ्यांचे सुद्धा रक्षण करण्यासाठी या भारत मातेसाठी सदैव तत्पर राहण्यास सांगितले .शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजन चेटियार यांनी सुद्धा कार्यक्रमाचा माध्यमातून पाहुण्यांना रोप देऊन त्यांचे स्वागत केले व मुलींचे कौतुक केले व आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले या संपूर्ण उपक्रमासाठी शाळेच्या शिक्षिका सौ.अनिता म्हस्के व सौ .प्रियांका शेळके यांनी आपले योगदान दिले व आपले मत मांडले.
कार्यक्रमात दहावीच्या मुलींनी सुद्धा आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया पाहुण्यांसमोर येऊन व्यक्त केली. कार्यक्रमाचा शेवट नेहमीच्या प्रार्थनेने झाला .आभार प्रदर्शन सौ.सोनाली अकोलकर यांनी केले.
या संपूर्ण उपक्रमासाठी शाळेच्या अध्यक्षा सौ. आसावरी धर्माधिकारी मॅडम व शाळेचे मुख्याध्यापक श्री .राजन चेटीयार सर यांचे मार्गदर्शन लाभले.