विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यम शाळा.
🍁 गणेशोत्सव - 23 🍁
दिनांक 19 सप्टेंबर 23 रोजी , श्री गणेश चतुर्थी या दिवशी विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्लिश मिडियम शाळेत श्री .गणेश मूर्तीची स्थापना इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते वाजत गाजत ,लेझीमच्या तालात करण्यात आली .
गणपतीची आरास तयार करताना भारतीय संस्कृतीची प्रतीके, म्हणजेच वेगवेगळ्या सांस्कृतिक शुभचिन्हांचा वापर करण्यात आला जसे शंख, गदा,स्वस्तिक , गोपद्म ,श्रीफळ ,जपाची माळ , तुळशीवृंदावन,कमळ , सरस्वती, सुदर्शनचक्र, गंध, तिलक,समई. सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून या चिन्हांसाठी पर्यावरण पूरक अशाच साधनांचा वापर केला होता आणि त्याविषयीची माहिती सुद्धा दर्शनी भागात लिहून ठेवली होती .शाळेतील मुलांना या शुभ चिन्हांची व प्रतिकां विषयी माहिती व्हावी आणि त्यांच्या सांस्कृतिक ज्ञानात भर व्हावी हाच त्या मागचा हेतू होता . विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेतला.
👉🏻दिनांक 20 सप्टेंबर पासून रोज 25 सप्टेंबर पर्यंत सकाळी साडेआठ lवाजता गणपतीची आरती करण्यात येत होती.आरतीसाठी रोज इयत्ते नुसार (पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी, दहावी ) मुलांची उपस्थिती होती .
आरतीसाठी दररोज वर्गातील प्रथम ,द्वितीय क्रमांक आणणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलवण्यात आले होते व त्यांच्या हस्ते आरती व प्रसाद वाटप करण्यात येत होते .
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गणेशोत्सवानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .
👉🏻 इयत्ता पाचवी साठी
१) तोरण बनवणे आणि आरती म्हणणे
इयत्ता सहावी साठी
१) गणपतीच्या गोष्टी सांगणे आणि ग्रीटिंग कार्ड बनवणे
इयत्ता सातवी साठी
१) गॅस विरहित मोदक बनवणे आणि चित्र काढून रंगवणे. चित्रासाठी विषय : गणपतीची आरास
इयत्ता आठवीसाठी
१) फळ आणि भाज्या वापरून सजावट तयार करणे आणि श्री गणपती अथर्वशीर्ष पठण.
अशा विविध स्पर्धा परीक्षणासाठी संस्थेच्या इतर विभागातील तज्ञ शिक्षकांना परीक्षक म्हणून बोलवण्यात आले होते.
दिनांक 25 सप्टेंबर रोजी शाळेत सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते . शाळेचे मुख्याध्यापक व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
पूजा सांगण्यासाठी राणी भुवन येथे याद्निकीचे प्रशिक्षण घेतलेल्या सौ. क्षीरसागर ताई आल्या होत्या. शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला .
गणपतीची मूर्ती पर्यावरण पूरक अशा शाडू मातीने शाळेतल्या चित्रकलेच्या शिक्षिकांकडून बनवण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी सी एच एम ई सोसायटीचे , माननीय हेमंत देशपांडे सर, संजय पगारे सर , समिती सदस्य श्री. गिरीश वैशंपायन, सौ. शुभदा राजे आणि इतर शाळेतील मुख्याध्यापक उपस्थित होते.
👉🏻 दिनांक 25 सप्टेंबर रोजी शाळेत श्री गणेश प्रतिमा विसर्जनाचा कार्यक्रम शाळेतील इयत्ता दहावीच्या मुलांच्या हस्ते साजरा करण्यात आला श्री गणेश प्रतिमेचे विसर्जन शाडू माती रक्षक श्री. विनायक रानडे सर यांनी सांगितल्याप्रमाणे शाडू मातीचा पुनर्वापर कसा करता येईल या पद्धतीने करण्यात आले.
शाळेतील सर्व कार्यक्रमांसाठी शाळेच्या माननीय चेअरमन सौ. आसावरी धर्माधिकारी मॅडम व शाळेचे मुख्याध्यापक श्री .राजन चेट्टीयार सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.