प्लास्टिक मुक्त गोदावरी

06 Oct 2023 14:04:16
 
 
 प्लास्टिक मुक्त गोदावरी
 
प्लास्टिक मुक्त गोदावरी
 
 
दैनिक देशदूत अंतर्गत, सफर गोदावरीची यांच्या द्वारे विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यम येथे, माननीय चेअरमन मॅडम सौ. आसावरी धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदिनी नदी स्वच्छता, गोदावरी नदीचा इतिहास आणि सद्यस्थिती असा माहिती पर कार्यक्रम राबवण्यात आला होता. त्या अंतर्गत आज दि.२ ऑक्टोबर रोजी आनंदवली ते रामकुंड या परिसरात 'प्लास्टिक मुक्त नाशिक' व 'प्लास्टिक मुक्त गोदावरी' चळवळी अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शहरातील पर्यावरण हे स्वच्छ हवा , नितळ पाणी , हिरवीगार झाडे , डोंगर यांवर अवलंबून असते.ह्या गोष्टी चांगल्या असतील तरच शहरातील पर्यटन चांगले होते .
निसर्गाची सेवा हीच मानव सेवा मानणाऱ्या समाजसेवींच्या एकत्रिकरणातूननिर्माण झालेल्या 'अविरल गोदावरी 'आणि ' सफर गोदावरी ' या संस्थांद्वारे गोदावरी स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.
 

प्लास्टिक मुक्त गोदावरी 
आज या कार्यक्रमात खारीचा वाटा म्हणून सें.हिं. मि. ए.सो. संचालित विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यम या शाळेने थोडासा पुढाकार घेतला . या उपक्रमात शाळेतील शिक्षका सौ. सुनीता निचळ आणि शाळेतील इ. ८ वी च्या विद्यार्थी कु.मृण्मयी चिंतामणी , कु. वैभवी पाटील , कु. पृथ्वीराज खैरे ,कु. साईराज खैरे , कु . प्रणव मेटकर यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला .
 
 
प्लास्टिक मुक्त गोदावरी
कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक व क्रिया योगाचे गुरु श्री.एम हे उपस्थित होते. तसेच नाशिकचे सुपुत्र मराठी चित्रपट आणि सिने सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते श्री . चिन्मय उदगीरकर २ वर्षांपासून या कार्यक्रमात सहभागी आहेत. यासाठी शाळेचे माननीय चेअरमन मॅडम सौ. आसावरी धर्माधिकारी आणि मुख्याध्यापक श्री. राजन चेट्टीयार सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच दैनिक देशदूत यांनी मुलांचे काही लहान लहान विडियो त्यांच्या लिंक वर प्रसारित केले. त्या मुळे विद्यार्थ्यांनी आपल्या शहरातील नदीचा इतिहास, उपयोग, धार्मिक महत्त्व, भौगोलिक रचना, सद्यस्थिती अशी सर्वांगीण माहिती जाणून घेतली.
 
Powered By Sangraha 9.0