संस्कृत दिवस

Vidya Prabodhini Prashala English 5th to 10th    22-Aug-2024
Total Views |
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती। तत्रापि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
 
 
संस्कृत दिवस
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यम या शाळेमध्ये 20 ऑगस्ट 2024 रोजी संस्कृत दिवस साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत शिक्षिका स्मिता जोशी यांनी केले.
कार्यक्रमात " मम् माता देवता" हे संस्कृत गीत विद्यार्थींनीनी गायले. तसेच विद्यार्थ्यांनी "संस्कृत कथा काष्ठीकस्य निस्पृहता" या कथेवर आधारित अभिनय सादर केला . " किम मिथ्या किम वास्तवम्? " इंटरनेट चे विश्व कसे आभासी असा संदेश देणारी आहे लघु नाटिका विद्यार्थिनींनी सादर केली. तसेच नमामि ...नमामि संस्कृत गीतावर आकर्षक नेत्रदीपक असे नृत्य ही विद्यार्थिनींनी सादर केले.
शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.प्रियांका भट यांनी संस्कृत भाषा कशी मधुर आहे तिचे महत्त्व आपल्या भाषणातून मुलांना सांगितले.
शालेय समितीचे अध्यक्ष श्री.जयंत खेडेकर सर यांनी मुलांना केलेल्या आपल्या मार्गदर्शनात संस्कृत भाषा आपणच कशी विसरलो आहोत , ती संगणकासाठी कशी उपयुक्त आहे असे सांगितले.
कार्यक्रमात शेवटी विद्यार्थ्यांनी बनवलेले संस्कृत शब्दकोष संस्कृत घड्याळ,संस्कृत दिनदर्शिका यांचे अवलोकन शालेय समितीचे अध्यक्ष श्री. जयंत खेडेकर सर, मुख्याध्यापक श्री. राजन चेट्टीयार सर यांनी केले. त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक ही केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांना शाळेच्या संस्कृत शिक्षिका सौ स्मिता जोशी , चित्रकला शिक्षिका सौ प्रगती जाधव व नृत्यासाठी सौ.युगंधरा महाले यांचे सहकार्य लाभले.*
कार्यक्रमास शालेय समितीचे अध्यक्ष श्री. जयंत खेडेकर सर, मुख्याध्यापक श्री. राजन चेट्टीयार सर, पर्यवेक्षिका सौ.प्रियांका भट यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमास समन्वयिका सौ मीनाक्षी आमले मॅडम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उत्साहाने सहभागी होते.