विद्यार्थी प्रतिनिधींचा पदग्रहण सोहळा
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यम या शाळेमध्ये 25 जुलै 2024 रोजी विद्यार्थी प्रतिनिधींचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. लोकशाहीपद्धतीने प्रतिनिधी कसा निवडावा व मंत्रिमंडळाची स्थापना कशी करावी याचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. शाळेमधील विद्यार्थ्यांना एक कृतीयुक्त धडा देण्याचा हा छोटासा प्रयत्न ..
कार्यक्रमाचा प्रारंभ स्वागत गीत व प्रमुख पाहुण्यांच्या परिचय स्वागत सत्काराने झाला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकच्या सुप्रसिद्ध समाजसेविका डॉ. वर्षा भालेराव लाभल्या होत्या . नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधिंनी आकर्षक अशा परेडचे संचालन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली व पाहुण्यांनी शाळेचं ध्वज फडकावला.
नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधिंनी आपल्याला दिलेल्या जबाबदारीशी आपण प्रामाणिक राहू, वचनबद्ध राहू अशी शपथ घेतली.
प्रमुख पाहुण्या डॉ. वर्षा भालेराव शाळेचे अध्यक्षा सौ. आसावरी धर्माधिकारी शाळेचे मुख्याध्यापक श्री राजन चेट्टीयार यांच्याकडून नवनिर्वाचित मंत्रिमंडळातील प्रतिनिधिंनीना पदचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुण्या डॉ. वर्षा भालेराव यांनी विद्यार्थ्यांना आपल्या प्रेरणादायी भाषणातून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी नेतृत्व किती महत्त्वाचा आहे हे पटवून दिले.
कार्यक्रमासाठी शाळेचे अध्यक्षा आसावरी धर्माधिकारी शाळेचे मुख्याध्यापक श्री राजन चेट्टीयार सुपरवायझर सौ.प्रियांका भट यांचे मार्गदर्शन होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे क्रीडाशिक्षक श्री अनिल दुसाने सरांनी अथक परिश्रम घेतले तसेच
सौ .प्राची देशपांडे व सौ अनिता हिरे मॅडम यांचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. कार्यक्रम शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सांगता मेघालयातील विद्यार्थीर्नींनी पारंपारिक वेशभूषेत सादर केलेल्या संपूर्ण वंदे मातरम् या राष्ट्रगान गीताने करण्यात आली.