विद्या प्रबोधिनी मध्ये बालसभा उत्साहात साजरी.
नाशिक: सेंट्रल हिंदू मिलिटरी संचलित विद्या प्रबोधिनी प्रशाला (इंग्रजी माध्यम) शाळेत मंगळवार(23 जुलै 2024) शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील पहिली बाल सभा इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात पार पाडली. बालसभेसाठीचा विषय "वृक्षांचे महत्त्व" हा होता. विद्यार्थ्यांना आपल्या जीवनामध्ये वृक्षांचे असलेले अनन्य असे महत्त्व कळावे हा यामागील हेतू असून,विद्यार्थ्यांनी आपल्या भाषण कौशल्याद्वारे व नृत्याद्वारे वृक्षांचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये किती आहे, हे कार्यक्रमाच्या द्वारे निदर्शनास आणून दिले.
या कार्यक्रमांमध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदविला. सूत्रसंचालना पासून तर संपूर्ण कार्यक्रमाची धुरा ही विद्यार्थ्यांनी सांभाळलेली होती.विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, वक्तृत्व, सभाधीटपणा, संवाद कौशल्य, आत्मविश्वास,लेखन-वाचन, सृजनशीलता, निर्णयक्षमता, श्रमप्रतिष्ठा व कलाकौशल्य हे मूल्य रुजावे या उद्देशाने बालसभेची संकल्पना ही गेल्यावर्षीपासून शालेय समिती अध्यक्ष सौ.आसावरी धर्माधिकारी मॅडम यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.सभेसाठी प्रमुख अतिथी म्हणून बागायती कामामध्ये अग्रेसर असणारे श्री.रवींद्र दांडगे उर्फ रवी मामा हे उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी संगीत शिक्षिका सौ.निलीमा दलाल यांनी गीत गायन केले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी छान असे नृत्य प्रदर्शित केले.कार्यक्रमाच्या वेळी पर्यवेक्षिका सौ. प्रियांका भट यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणाद्वारे वृक्षाचे महत्व व पर्यावरणाचा समतोल याचे महत्त्व सांगितले.
तसेच समन्वयक सौ मीनाक्षी आमले यादेखील कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
आजचा हा पहिला बालसभेचा कार्यक्रम शालेय समिती सदस्या सौ .आसावरी धर्माधिकारीआणि शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजन चेट्टीयार यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा झाला.कार्यक्रमासाठी शिक्षिका सौ.आशा जाधव यांनी परिश्रम घेतले.