आषाढी एकादशी
"पंढरीची वारी जयाचिये कुळे
त्याचे पाय धुळे लागो मज"
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित विद्याप्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आषाढी एकादशी जल्लोषात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचा प्रारंभ संस्कृत गणेश स्तवनाने झाला. मान्यवरांच्या हस्ते श्री. विठ्ठलाच्या पालखीचे एवं ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करण्यात आले.नतंर विद्यार्थ्यांनी मधुर भक्तीगीते गायली व वातावरण अतिशय भक्तिमय झाले. ताटी उघडा ज्ञानेश्वरा ही नाट्यछटा तसेच रुखमाई-रुखमाई या मनमोहन नृत्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले.
तसेच स्वच्छता व वारी या विषयावर विद्यार्थ्यांनी नाटकाचे सादरीकरण केले .
सर्व विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत विठुरायाची पालखी काढली व दिंडीत सहभागी झाले होते. कार्यक्रमात शेवटी पंढरपुरात जसा रिंगण सोहळा सादर केला जातो तसा रिंगण सोहळा व पाऊली नृत्य विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले. वातावरण टाळ व विठुनामाच्या गजराने दुमदुमून गेले.कार्यक्रमासाठी शाळेच्या अध्यक्षा सौ. आसावरी धर्माधिकारी मॅडम,मुख्याध्यापक श्री राजन चेट्टीयार सर, पर्यवेक्षिका सौ.प्रियांका भट यांचे मार्गदर्शन लाभले.*
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.नीलिमा दलाल, सौ.कमल महाजन , सौ श्रध्दा घोलप , सौ. अनिता हिरे ,सौ.प्रगती जाधव यांचे सहकार्य लाभले.