इयत्ता सहावी ते दहावी स्वागत

Vidya Prabodhini Prashala English 5th to 10th    27-Jun-2024
Total Views |
सी. एच.एम. ई सोसायटी अंतर्गत विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्लिश मिडियम शाळेत २०२४ - २५ च्या शैक्षणिक वर्षांतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.( इयत्ता सहावी ते दहावी)
 

इयत्ता सहावी ते दहावी स्वागत
 
 
नवीन सत्राची सुरुवात ही नेहमीच उत्साहाने भरलेली असते.
माननीय प्राचार्य श्री. राजन चेट्टियार सर, पर्यवेक्षिका सौ. प्रियंका भट मॅडम, शाळेचे समन्वयक , तसेच शाळेचे सर्व शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले केले.
या निमित्याने शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक छोटेखानी कार्यक्रमही सादर करण्यात आला. यामध्ये संगीत शिक्षिका सौ. दलाल यांनी 'मन मंदिरा' हे गाणं सादर करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. प्रियांका भट मॅडम यांनी
'आशाए आशाए' या गाण्यातून विद्यार्थ्यांना भावी जीवनाविषयी आपण कसे कटिबद्ध झालं पाहिजे याची माहिती दिली, त्याचप्रमाणे शिक्षकांनी (माईनॲक्ट )मधून विद्यार्थ्यांना योग्य आणि अयोग्य जीवनशैली व त्या जीवनशैलीचे फायदेतोटे याविषयी या मूक अभिनयातून संबोधित केले. जीवनामध्ये उद्दिष्ट हे किती महत्त्वाचे आहे. जागृतीतून संघटन, भावना, मदत याविषयी मूल्य स्पष्ट केली.
अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा पहिला दिवस उत्साहपूर्ण आणि आनंदीमय वातावरणात साजरा होईल याकडे विशेष करून लक्ष दिले. हा दिवस सकारात्मकता आणि उत्साहाने सादर केला गेला.
शाळेचे मा. मुख्याध्यापक राजन चेट्टियार सरांनी विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षकांची ओळख करून दिली, पुढील शैक्षणिक वर्षात आपल्या पुढचे उद्दिष्ट आणि त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण कसे प्रयत्न केले पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले.
तसेच समन्वयक सौ मिनाक्षी मॅडम, सौ. सोनाली मॅडम या उपस्थित होत्या
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ.अनिता हिरे, सौ.मनीषा बेंडकुळे, सौ पौर्णिमा जाधव , सौ.नीलिमा दलाल, सौ.श्रद्धा घोलप , सौ प्रगती जाधव श्री.अनिल दुसाने सर यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मनीषा बेंडकुळे व सौ अनिता हिरे यांनी इंग्रजी भाषेतून केले.
या कार्यक्रमास शालेय समितीच्या अध्यक्षा मा. सौ आसावरी धर्माधिकारी मॅडम, मा. प्राचार्य श्री. राजन चेट्टियार सर आणि पर्यवेक्षिका सौ. प्रियंका भट मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
धन्यवाद