विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्लिश मीडियम स्कूल
दिनांक 11 जानेवारी 24 रोजी आपल्या शाळेत श्री संत सेवा संघा तर्फे सौ प्राची भालेराव मॅडम यांनी भेट दिली.
त्यांनी आपल्या शाळेतील 16 जानेवारी ते 22 जानेवारी यादरम्यान होणाऱ्या व्याख्यानमालेच्या संदर्भात इयत्ता ६वी ते ९वी च्या विद्यार्थ्यांना , व सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले .
रामायणातील गोष्टी स्वरूपी राम सर्वांनाच माहित असला तरीही रामाच्या प्रत्येक कृती मागे असलेले कारण आणि रामाचे गुण आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. ते जर आपण आत्मसात करू शकलो तर आपले जीवन नक्कीच सुखकर होईल असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले .
16 जानेवारी ते 22 जानेवारी यादरम्यान होणाऱ्या प्रवचनाला सर्वांनी येण्याचे आवाहन सौ. प्राची मॅडम व श्री रोकडे सर यांनी केले.
कार्यक्रमासाठी मुलांनी सुद्धा उत्साह दाखवला व प्रवचनाला आई-वडिलांबरोबर येण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमात श्रीरामाचा गजर घेण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सोनाली अकोलकर यांनी केले.
आलेल्या पाहुण्यांनी शाळेत असलेल्या स्वस्त लिखित रामरक्षा प्रदर्शनाला भेट दिली
कार्यक्रमासाठी शाळेच्या अध्यक्षा सौ आसावरी धर्माधिकारी मॅडम व शाळेचे मुख्याध्यापक श्री राजन चेट्टीयार
सर यांचे मार्गदर्शन लाभले.
धन्यवाद
प्रिन्सिपल
VPP ENG