श्रीमद भगवद्गीता जयंती
सेंट्रल हिंदु मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत 22 डिसेंबर 2023 - श्रीमद भगवद्गीता जयंतीचे आयोजन करण्यात आले
या कार्यक्रमात श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथाचे पूजन करून विद्यार्थ्यांनी बाराव्या अध्यायाचे सामूहिक पठण केले. विद्यार्थ्यांना चित्रफिती द्वारा या दिवसाचे महत्व सांगण्यात आले. शाळेच्या अध्यक्षा सौ. आसावरी धर्माधिकारी मॅडम यांनी गीता ही आपल्या जीवनाची मार्गदर्शक कशी आहे हे मुलांना सोप्या भाषेत समजावले. तसेच शिक्षक संजय अस्वार यांनी महाभारतातील काही कथा सांगितल्या आणि गीतेचे महत्व विषद केले. सौ. स्मिता जोशी यांनी (संस्कृत शिक्षिका) विद्यार्थ्यांसोबत श्रीमद्भगवद्गीतेचे बाराव्या अध्यायाचे पठण केले . व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शाळेच्या अध्यक्ष धर्माधिकारी मॅडम आणि मुख्याध्यापक चेट्टियार सर यांचे या कार्यक्रमाला मार्गदर्शन लाभले.