🍁विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्लिश मिडीयम स्कूल🍁
दिनांक 6 डिसेंबर 2023 पासून 14 डिसेंबर 2023 पर्यंत शाळेच्या 🌸 फाऊंडर्स डे 🌸निमित्त शाळेत नवनवीन उपक्रम सप्ताहाद्वारे सादर करण्यात आले .
⭐ ६ डिसेंबर रोजी इयत्ता पाचवीने- एक छोटी नाटिका डॉक्टर मुंजे यांच्या जीवनावर आधारित सुंदररीत्या सादर केली .
⭐ ७ डिसेंबर रोजी इयत्ता सहावी- ने मनोरंजक अशी प्रश्नमंजुषा डॉक्टर मुंजे यांच्या कारकीर्दीवर आधारित विद्यार्थ्यांसाठी सादर केली होती
विद्यार्थ्यांचा यात उत्स्फूर्त सहभाग होता .
⭐ ८ डिसेंबर रोजी इयत्ता सातवी- ने सुद्धा डॉक्टर मुंजे यांच्या जीवनातील एक /दोन प्रसंग विद्यार्थ्यांसमोर अगदी उत्तमरीत्या प्रस्तुत केले जसे लोकमान्य टिळकांना डॉ . मुंजे आपले राजकिय गुरु मानत होते व टिळकांचा एकनिष्ठ अनुयायी म्हणुन जगणे त्यांनी आनंदाने स्वीकार केले होते.
⭐ ११ डिसेंबर रोजी इयत्ता आठवी - डॉ. मुंजे यांनी नाशिक मध्ये प्रसिद्ध भोसला मिलिटरी स्कूल येथे निर्माण केलेल्या विविध स्तरांवरील शाळांचे निवेदन केले . यामध्ये 1)भोसला मिलिटरी स्कूल बॉइज.
2) मिलिटरी स्कूल गर्ल्स,
3) विद्या प्रबोधिनी प्रशाला ,
4) नर्सिंग कॉलेज, 5) मॅनेजमेंट कॉलेज, अशा विविध स्तरावरील शैक्षणिक इमारतींचा उल्लेख करून त्यांची माहिती दिली व त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे कसे दरवाजे खुले केले आहेत हे दाखविले
⭐ 12 डिसेंबर रोजी- डॉ . मुंजे यांची 151वी पुण्यतिथी संस्थेने मोठ्या दिमाखात साजरी केली .
⭐ 13 डिसेंबर रोजी - विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्लिश मीडियम येथील विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून डॉ. मुंजे यांची अगदी हुबेहूब प्रतिकृती प्रार्थना हॉलमध्ये उभी केली होती.
⭐ १४ डिसेंबरला इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी- त्यांच्या लढवय्या या पुस्तकातील त्यांच्या जीवन मूल्यांचे दर्शन करत अभिवाचन सादर केले सप्ताहाचा समारोप केला .
शाळेतील या पूर्ण उपक्रमाला शाळेच्या अध्यक्षा सौ. आसावारी धर्माधिकारी मॅडम व शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजन चेटियार सर यांचे मार्गदर्शन लाभले आणि सर्व स्टाफ चे सहकार्य मिळाले