🍁 विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्लिश मीडियम स्कूल 🍁
आपल्या शाळेतील आदरणीय चेअरमन सौ. आसावरी धर्माधिकारी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांसाठी संस्कार भारती रांगोळीच्या शिबिराची सुरुवात झाली. दोन दिवसाच्या या (विनामूल्य) शिबिरासाठी पंधरा शिक्षकांनी आणि तीन मावशींनी सहभाग घेतला आहे . यामध्ये पहिल्या भागात रांगोळीच्या बिंदू , रेषा, अर्ध वर्तुळ, वर्तुळ, चक्रावर्धिनी,गोपद्म , विविध प्रकारचे तुरे, जाळी, पान जाळी, सर्प रेषा अशी सगळी चिन्हे शिकवली. व ही चिन्हे वापरून नक्षीकाम कसे करायचे याचे प्रात्यक्षिकांद्वारे मॅडमनी मार्गदर्शन केले .
आज पांढऱ्या रांगोळीचा वापर करण्यात आला.वापरलेली रांगोळी सुद्धा परत परत कशी वापरता येईल याबद्दल मॅडमनी खूपच चांगल्या सूचना केल्या . *रांगोळीतील चिन्ह समजवताना व शिकवितांना त्यातील गर्भित अर्थां ची आपल्या जीवनाशी सांगड त्यांनी घालून दिली.रांगोळी हे केवळ दारा समोरीलसजावट नसून आपली परंपरा, संस्कृती आहे. आणि ती प्रत्येक स्त्री ने जपली पाहिजे.एका पिढी कडून दुसऱ्या पिढी पर्यंत पोहचली पाहिजे असेही छान पटवून दिले. या प्रशिक्षणाला
शिक्षकांनी उत्स्फूर्तरीत्या चांगला प्रतिसाद दिला आणि नवीन काही शिकण्याचा अनुभव घेतला.
शिबिराचा दुसरा भागात छोटी रांगोळी आणि मग मोठी रांगोळी , चिन्ह वापरून कशी काढायची याची प्रात्यक्षिके झाली .
मोठमोठ्या रांगोळ्यांची एक सारखे मापे एकाच दोरीने लांब वेगवेगळ्या ठिकाणी गाठी बांधून घेण्यात आली . त्यातही भूमितीच्या शिक्षकांचे कस लागले . मोठी रांगोळी काढताना कामाचे विभाजन गटात करण्यात आले .कोणत्या प्रकारचे नक्षीकाम कोणत्या आकारासाठी योग्य आहे हे सांगतानाच त्यांची सांगड रंगसंगतीसाठी कशी करता येईल याचीही माहिती आम्हाला देण्यात आली .
चढाओढीने प्रत्येक गटाने अगदी नेटाने , उत्साहाने , उत्स्फूर्तरीत्या ,छान छान रांगोळ्या काढल्या .
नंतरच्या भागात रंग भरण्यासाठी एक मोठी रांगोळी काढण्यात आली , त्यासाठी गाळणीचा आणि हाताचा उपयोग करण्यात आला . रांगोळी कोणत्या सणासाठी विशेष काढली जात आहे त्याचे सुद्धा मराठीतून शब्दांकन रांगोळीत कसे
सुबकरीत्या करता येईल हे सुद्धा आम्हाला सौ.आसावरी धर्माधिकारी मॅडम यांनी करून दाखविले .
सगळ्या शिक्षकांना या प्रशिक्षणातून रांगोळी काढण्यासाठी तर उपयोग होईलच परंतु आज शाळेच्या चेअरमन सुद्धा आमच्यात आमच्या सारख्या मिसळून त्यांनी आम्हाला जो आनंद दिला आणि सगळ्यांमध्ये स्वतःला सामावून घेतले हा पण एक छान अनुभव आमच्यासाठी अविस्मरणीय आहे .
आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजन चेट्टीयार सर यांनी सुद्धा आम्हाला वेळेची सवलत उपलब्ध करून दिली तसेच आमच्या शाळेच्या मामा मावशींनी सुद्धा खूप मदत केली त्यांच्या शिवाय हे कार्य होऊ शकले नसते .
विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यमच्या सगळ्या शिक्षकांतर्फे मी आमच्या चेअरमन सौ. आसावरी धर्माधिकारी मॅडम यांचे आभार मानते की त्यांनी अगदी वेळात वेळ काढून आम्हाला या प्रशिक्षणात संस्कार भारती ही रांगोळी शिकविली.
Asawari Kulkarni Dharmadhikari